हा ॲप तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आरती, व श्रीराम जय राम जय जय राम ह्या बीज मंत्राचे वेगवेगळ्या रागातील नामसंकीर्तन उपलब्ध करून देण्यासाठी बनवला आहे.त्यासाठी आकारले जाणारे शुल्क वेबसाईटवर असलेल्या, तुम्ही निवडलेल्या कोणत्याही एका एनजीओला दिले जाते. त्यापैकी एक छोटासा भाग सुद्धा आमच्याकडे येत नाही.तुम्हाला बीज मंत्र मिळावा व संस्थांना तुमच्यातर्फे थोडी आर्थिक मदत व्हावी या दुहेरी फायद्यांसाठी ही सोय केलेली आहे.तसेच ह्या ॲपद्वारे तुम्हाला विविध ठिकाणी होणाऱ्या सत्संगांबद्दल माहिती मिळू शकेल, मागे झालेल्या सत्संगांचे रेकॉर्डिंग पहाता व डाउनलोड करता येईल आणि ऑनलाईन होणाऱ्या सत्संगांमध्ये सहभागी सुद्धा होता येईल.हा ॲप वापरून तुम्ही पारमार्थिक चर्चेत भागही घेऊ शकता.